राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी बोराची आवक (Bor) झाली. बोराला सरासरी 20 रुपये प्रति किलो भाव मिळाला. राहाता बाजार समितीत बोराच्या (Bor) 5 कॅरेटची आवक झाली. बोराला सरासरी 20 रुपये प्रति किलो भाव मिळाला. संत्र्याला 10 ते 30 रुपये तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 50 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) प्रति किलो 10 ते 15 रुपये तर सरासरी 12 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 149 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 171 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 170 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.
सोयाबीनची (Soybeans) 27 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 4021 ते 4250 रुपये तर 4200 रुपये सरासरी भाव मिळाला. मका ला 1150 ते 1650 रुपये तर सरासरी 1400 रुपये भाव मिळाला. हरभर्याला (Grams) सरासरी 5685 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




