Saturday, September 12, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 250 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 798 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये ते 250 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybeans) 7 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 7231 रुपये भाव मिळाला. गव्हाची 70 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला किमान 2300 रुपये, जास्तीत जास्त 2400 रुपये, तर सरासरी 2350 रुपये भाव मिळाला. मका सरासरी 1900 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 5300 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Breaking News : सप्तशृंगीगडावरील घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट; पोलिसांकडून वाहतूक...

0
नांदुरी | वार्ताहर Nanduri सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट...