राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी डाळिंबाला प्रति किलो 505 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 13,525 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 311 ते 505 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 171 ते 310 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 91 ते 170 रुपये भाव मिळाला.
डाळिंब नंबर 4 ला 10 ते 90 रुपये प्रति किलो भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 12,591 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1,500 ते 1,800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1,000 ते 1,450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 950 रुपये, जोड कांद्याला (Onion) 600 ते 1,200 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) 4 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रूटला 35 ते 80 रुपये, तर सरासरी 60 रुपये प्रति किलो भाव मिळाला.




