Friday, February 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी डाळिंबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 200 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची 945 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 156 ते 200 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 रुपये ते 155 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सीताफळाच्या 118 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला (Sitaphal) किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 90 रुपये तर सरासरी 55 रुपये प्रतीकिलोला भाव मिळाला. पेरूला (Guava) 7 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. ड्रेगन फ्रुटची (Dragon Fruit) 176 क्रेट्स ची आवक झाली. ड्रेगन फ्रुटला (Dragon Fruit) 25 ते 75 रुपये तर सरासरी 60 रुपये भाव मिळाला. लोणी खुर्द उपबाजार आवरतील भाजीपाला मार्केटचे वार बुधवार शुक्रवार रविवार या दिवशी भाजीपाल्याचे लिलाव होतील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...