Wednesday, May 20, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 225 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 998 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 225 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 16 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला किमान 2448 रुपये, जास्तीत जास्त 2526 रुपये, तर सरासरी 2485 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1502 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. तुरीला सरासरी 7000 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) किमान 5111 रुपये, जास्तीत जास्त 5251 रुपये तर सरासरी 5180 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यस्तरीय समिती

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या...