Saturday, September 12, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 754 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybeans) 3 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 7100 रुपये भाव मिळाला. गव्हाची 9 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2231 रुपये, जास्तीत जास्त 2242 रुपये, तर सरासरी 2286 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 7100 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 5100 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...