राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला जास्तीत जास्त 4447 रुपये भाव मिळाला. 6 क्विंटल सोयाबीनची (Soybeans) आवक झाली. सोयाबीनला किमान 4200 रुपये, जास्तीत जास्त 4447 रुपये तर सरासरी 4400 रुपये भाव मिळाला. मुग (डागी) 2 क्विंटलची आवक झाली. मुगाला सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 5672 कॅरेटची आवक झाली. डाळींबाला 246 ते 375 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 176 रुपये ते 245 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 91 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 20 ते 90 रुपये भाव मिळाला. पेरुच्या 6 क्रेटसची आवक झाली. पेरुला प्रतिकिलोला 60 ते 75 रुपये तर सरासरी 65 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व प्र. सचिव सुभाष मोटे यांनी दिली.
वांबोरीत कांदा 4300 रुपये
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
सोमवार दिनांक 02 सप्टेंबर रोजी वांबोरी (Vambori) उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 47 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 3 हजार 505 रुपये ते 4 हजार 300 रुपये, दोन नंबरचा कांदा 2 हजार 5 रुपये ते 3 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 500 रुपये ते 2000 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 2 हजार 500 रुपये ते 3 हजार 800 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 27 कांदा (Onion) गोण्यांना 4 हजार 700 रुपये, 9 कांदा गोण्यांना 4 हजार 600 रुपये, 129 कांदा गोण्यांना 4 हजार 500रुपये तर 79 कांदा गोण्यांना 4 हजार 400 रुपये भाव मिळाला.