राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला 5461 रुपये इतका भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 5055 रुपये, जास्तीत जास्त 5461 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला. गहु (Wheat) सरासरी 2550 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. मकाला (Corn) 1551 ते 1971 रुपये तर सरासरी 1800 रुपये. ज्वारीला (Sorghum) जास्त सरासरी 3500 रुपये भाव मिळाला. बाजरीला (Millet) 1930 ते 2075 रुपये, सरासरी 2000 रुपये. डाळींबाच्या (Pomegranate) 92 कॅरेटची आवक झाली.
डाळींबाला (Pomegranate) प्रतिक्विंटलला 1000 ते 8750 रुपये, तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 123 क्रेटसची आवक झाली. 500 ते 5000 रुपये भाव मिळाला तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला, पेरुला 1500 ते 2250 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला.