राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत सोयाबीनला गुरुवारी जास्तीत जास्त 5412 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4600 रुपये, जास्तीत जास्त 5412 रुपये तर सरासरी 5275 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3601 रुपये. गहू कमीत कमी 2751 रुपये, जास्तीत जास्त 2850 रुपये, तर सरासरी 2800 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंबाच्या 725 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एक ला 131 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये, तर डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये असा भाव मिळाला. सीताफळ कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 6250 रुपये तर सरासरी 3500 रुपये भाव मिळाला.