राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. मकाची 1 क्विंटलची आवक झाली.
मकाला सरासरी 1600 रुपये भाव प्रति क्विंटलला मिळाला. गव्हाच्या 19 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. गव्हाला 2476 रुपये ते 2696 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, तर सरासरी 2585 रुपये भाव मिळाला.
संत्रीच्या (Oranges) 5 कॅरेटची आवक झाली. संत्रीला (Oranges) प्रति किलोला कमीत कमी 20 रुपये, जास्तीत जास्त 35 रुपये तर सरासरी 28 रुपये भाव मिळाला. चिकूला सरासरी 23 रुपये प्रति किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.





