राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 305 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या 1027 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये ते 305 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. कैरीच्या 11 कॅरेटची आवक झाली. कैरीला प्रतिकिलोला किमान 17.50 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये तर सरासरी 22.50 रुपये भाव मिळाला.
गव्हाची 11 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला सरासरी 2271 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 8 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 6731 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. हरभरा सरासरी 5600 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




