राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2747 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर (Onion) एकला 3500 ते 4600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2200 ते 3450 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2150 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 3500 रुपये. जोड कांदा (Onion) 700 ते 1500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 17 क्रेट्सची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला (Dragon Fruit) कमीत कमी 10 रुपये, जास्तीत जास्त 110 रुपये तर सरासरी 100 रुपये किलो. संत्रीच्या 11 क्रेट्सची आवक झाली. प्रतिकिलोला किमान 3 रुपये, जास्तीत जास्त 30 रुपये तर सरासरी 16 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 27 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला किमान 25 रुपये, जास्तीत जास्त 65 रुपये तर सरासरी 45 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 3883 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 221 ते 353 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 ते 220 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 110 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.




