Sunday, June 14, 2026
HomeनगरOnion Prices : राहाता बाजार समितीत कांद्याच्या ४ हजार गोण्यांची आवक; किती...

Onion Prices : राहाता बाजार समितीत कांद्याच्या ४ हजार गोण्यांची आवक; किती भाव मिळाला?

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याचा उच्चांकी दर १५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

- Advertisement -

बाजार समितीत काल एकूण ४ हजार ९६ कांदा गोण्यांची आवक झाली. लिलावादरम्यान मालाच्या गुणवत्तेनुसार भाव देण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मध्यम स्वरूपाच्या म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाच्या कांद्याला ८०० ते ११५० रुपये भाव मिळाला, तर तिसऱ्या क्रमांकाच्या कांद्यासाठी ४०० ते ७५० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित झाला.

इतर प्रकारच्या कांद्यामध्ये गोल्टी कांद्याला ५०० ते १००० रुपये आणि जोड कांद्याला १५० ते ३०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. राहाता बाजार समितीतील आवक आणि दर पाहता, शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या गुणवत्तेनुसार विक्रीसाठी नियोजन करावे, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...