राहाता (तालुका प्रतिनिधी)
राहाता बाजार समितीत काल कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. काल कांद्याच्या 7941 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 150 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 2615 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 171 रुपये ते 255 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 101 रुपये ते 170 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये. पेरू च्या 35 क्रेट्स ची आवक झाली. प्रतिकिलोला पेरू ला 20 ते 30 रुपये तर सरासरी 25 रुपये.
सीताफळाची 501 क्रेटची आवक झाली. सीताफळाला कमीत कमी 5 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला. संत्री ची 9 क्रेट्स ची आवक झाली. संत्रीला 10 ते 20 रुपये तर सरासरी 15 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची 162 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुट ला 20 ते 85 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




