Tuesday, October 6, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 200 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 9025 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2400 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1500 ते 2350 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1450 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 2200 रुपये. जोड कांदा (Onion) 400 ते 1200 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 12916 कॅरेट आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 200 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...