राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्यांची 1439 गोण्यांची आवक झाली. जास्तीत जास्त 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 1 ला 3800 ते 5000 रुपये. नंबर 2 ला 2400 ते 3750 रुपये. नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये. गोल्टी 1500 ते 4000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 800 ते 1700 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 1665 क्रेट्सची आवक झाली. नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.
सिताफळाच्या 37 क्रेट्सची आवक झाली. 20 ते 55 रुपये भाव मिळाला. पेरूची 13 क्रेट्सची आवक झाली. पेरूला सरासरी 27 रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रुटची (Dragon Fruit) 6 क्रेटची आवक झाली. 40 रुपये किलो भाव मिळाला.




