राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता (Rahata) शहरातील कायम गजबजलेल्या विरभद्र मंदीर परिसरात दिवसा ढवळ्या उघड्या भांड्याच्या दुकानातून सव्वा लाख रुपयांची चोरी (Theft) झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.
राहाता पोलिसात (Rahata Police) सीमा कुंभकर्ण ४७ रा. राहाता यांनी फिर्याद दिली आहे. कि मी आज रोजी २८ जून माझ्या मालकीचे राहाता विरभद्र मंदीरा समोरील बाजार तळावर असलेले साई स्टील (Sai Steel) हे भांड्याचे दुकानात गि-हाईक करीत असतांना काही अनओळखी इसम दुपारी दोन वाजेच्या सुमारास भांडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते.
मला भांडे दाखवण्यात गुंतवून माझ्या उघड्या गल्याच्या ड्रावर मधील रोख ८४ हजार रुपये व त्यात ठेवलेले दिड तोळ्याचे गंठन (Gold Chain) किमंत ४५ हजार रुपये असा १ लाख २९ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. फिर्यादी वरुन राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.