राहाता |का. प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी डिस्चार्ज घेणार्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. राहाता तालुक्यात काल केवळ 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून नवीन 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
राहाता तालुक्यात आतापर्यंत 20198 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 19985रुग्ण बरे होऊन घरी गेले.
त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 03 तर अँटीजेन चाचणीत 16 रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, दाढ बुदु्रक-02, लोणी बुद्रुक-01, गोगलगाव-01, डोर्हाळे-01, कोर्हाळे-01, कोल्हार-01, हनुमंतगाव-01, लोहगाव-02, शिंगवे-01, पुणतांबा-03, नपावाडी-03 असे एकूण 17 शिर्डी-01, राहाता-00 बाहेरील तालुक्यातील2 असे एकूण 20 रुग्ण आढळून आले आहेत.
काल राहाता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या कमी असली तरी डिस्चार्ज घेणार्यांची संख्याही खूपच कमी झाली आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही काहिशी कमी झाली आहे. तालुक्यात 204 रुग्ण अॅक्टीव्ह असून ते तालुक्यात व तालुक्या बाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.