Saturday, May 18, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात करोना रुग्ण संख्या घटली

राहाता तालुक्यात करोना रुग्ण संख्या घटली

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) केवळ 10 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहेत. काल 11 रुग्ण बरे होऊन गेले असले तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 163 झाली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22204 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 218642 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालय 02, खासगी रुग्णालयात 06 तर अँटीजेन चाचणीत 02 असे एकूण 10 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) एकरुखे-04, लोणी बुद्रुक-01, असे ग्रामीण 05 तर शहरी शिर्डी-02, राहाता-02, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 03 असे सर्व एकूण 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 163 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या