Sunday, September 8, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात करोनाचे चार रुग्ण!

राहाता तालुक्यात करोनाचे चार रुग्ण!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात करोनाचे चार गावात चार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील दोन बरे झाले तर दोन रुग्ण सक्रिय आहेत. तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील गोगलगाव, राहाता, केलवड बु. व लोणी खुर्द या गावांत प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे, असे तालुक्यात एकूण 4 गावांत 4 सक्रिय करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी राहाता आणि गोगलगाव येथील रुग्ण बरे झाले तर लोणी खुर्द आणि केलवड येथील रुग्ण सक्रिय आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या