Saturday, July 27, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 245 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता तालुक्यात 245 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 47 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळूून आले आहेत. काल 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 245 झाली असून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 21973 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21728 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी रुग्णालयात 27 तर अँटीजेन चाचणीत 20 असे एकूण 47 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, ममदापूर-01, एकरुखे-02, दाढ बुद्रुक-01, चंद्रापूर-01, लोणी बुद्रुक-02, लोणी खुर्द-02, डोर्‍हाळे-02, केलवड बुदुक-03, साकुरी-11, दहेगाव-01, कोल्हार-03, बाभळेश्वर बुदुक-02, हनुमंतगाव-01, सावळीविहिर खुर्द-01, पुणतांबा-02, रामपूरवाडी-01, असे ग्रामीण 39 तर शहरी शिर्डी-03, राहाता-04, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे सर्व एकूण 47 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 245 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या