Saturday, July 27, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 48 रुग्ण, 126 अ‍ॅक्टीव्ह; 49 जणांना डिस्चार्ज

राहाता तालुक्यात 48 रुग्ण, 126 अ‍ॅक्टीव्ह; 49 जणांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 48 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळूून आले असून तालुक्यातची चिंता वाढली पाहिजे. 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 126 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत.

- Advertisement -

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22497 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21385 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी रुग्णालयात 35 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 13 असे एकूण 48 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता (Rahata) तालुक्यातील लोणी बुदु्रक-08, लोणी खुर्द-08, कोर्‍हाळे-02, साकुरी-01, पिंपळस-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, पाथरे-03, हनुमंतगाव-06, रुई-02, वाकडी-02, रामपूरवाडी-01 असे ग्रामीण 36 तर शहरी शिर्डी-05, राहाता-05, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 02 असे सर्व एकूण 48 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 126 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या