Tuesday, July 16, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

राहाता तालुक्यात शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

तालुक्यातील वाकडी (Wakadi) येथील पानसरे वस्तीवरील एका तरुणावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. हा तरुण शेतात चारा काढण्यासाठी गेला होता. बिबट्याने प्राणघातक हल्ला करत या तरुणाला जखमी (Youth Injured) केले. या तरुणाची व बिबट्याची चांगलीच झटापट झाली. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तरुणाला मादी बिबट्या (Female Leopard) सोबत तिचे चार बछडे दिसून आले. वाकडीतील पानसरे वस्ती येथील तरुण शेतकरी सचिन सुभाष पानसरे हे जनावरांना चारा (Fodder) काढण्यासाठी गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास आपला ट्रॅक्टर घेऊन शेतात गेले होते.

चारा काढून झाल्यावर हा चारा टॅक्टरमध्ये (Tractor) टाकत असतांना शेजारील गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. दोघांची झटापट चालू असतांना त्या बिबट्याच्या पाठीमागे चार बछडे देखील असल्याचे दिसले. दोन मिनिटाच्या झटापटीनंतर सचिन यांनी आपली सुटका करुन वस्तीकडे धाव घेतली. या झटापटीत सचिन पानसरे यांच्या डोक्याला पंजाची नखाची जखम झाली आहे. तसेच हाताच्या दंडाला दात लागले आहे. तसेच चेहेर्‍यावर देखील खरचटले आहे. त्यास प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

सध्या दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. हे वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत बघून लोकवस्तीजवळ निवारा करत आहे. याच भागात एक वर्षापूर्वी दोन बिबट्याची झुंज होऊन दोन्ही बिबट्यांनी आपले प्राण गमावले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तर ही घटना घडली आहे. पानसरे वस्ती भागात लपण असल्याने या अगोदर पण या भागात मोठ्या प्रमाणात बिबटे आढळत होते. पण त्यांनी कधीच माणासांवर प्राणघातक हल्ला केला नाही. परंतु या घटनेने या भागात दहशीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांना (Leopard) जेरबंद करण्यासाठी वनविभागाने वाकडी भागात पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या