Sunday, July 26, 2026
HomeनगरRahata : वाकडी शिवारात बिबट्याचे चार बछडे आढळले

Rahata : वाकडी शिवारात बिबट्याचे चार बछडे आढळले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जाधव-पानसरे वस्ती परिसरात रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती तात्काळ कोपरगाव वनविभागाला देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाकडी शिवारातील जाधव-पानसरे वस्ती रोडवरून वाहनाने जात असताना रस्त्यालगत असलेल्या शेतात काही हालचाल होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी उपसरपंच सुरेश जाधव व सागर जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वाहन थांबवून गाडीच्या लाईटचा प्रकाश त्या दिशेने टाकला असता त्यांना त्या ठिकाणी तब्बल चार लहान बिबट्याचे बछडे दिसून आले. यावेळी त्यांनी बछड्यांचे फोटोही मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपले. यानंतर त्यांनी काही वेळ थांबून परिसरात मादी बिबट आहे का याचा अंदाज घेतला. मात्र त्यावेळी बछड्यांजवळ मादी बिबटे दिसून आली नाही. कदाचित आसपासच्या परिसरात शिकारीच्या शोधात गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जाधव-पानसरे वस्ती परिसरात सायंकाळच्या वेळी अनेक भागात लाईटचा अभाव असल्याने नागरिकांना अंधारात ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचे बछडे आढळल्याने वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या नागरिकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मादी बिबटे आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी अत्यंत आक्रमक होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाकडी शिवारात दिवसेंदिवस बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...