Friday, August 28, 2026
Homeक्राईमRahata : राहात्यात महिला व्यावसायिकास लुटणारे भोंदू साधू कोपरगावात अखेर गजाआड

Rahata : राहात्यात महिला व्यावसायिकास लुटणारे भोंदू साधू कोपरगावात अखेर गजाआड

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरातील नगर-मनमाड रोडवरील इशिता गिफ्ट गॅलरीमध्ये घुसून पैसे व सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो असा बहाणा करत महिला व्यापार्‍याची 45 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या दोन भामट्यांना राहाता पोलिसांनी तत्परतेने कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. राहाता येथील साई दर्शन टॉवरमध्ये इशिता गिफ्ट गॅलरी नावाचे दुकान आहे. बुधवारी (26 ऑगस्ट 2026) दुपारी 12:15 वाजेच्या सुमारास महिला या दुकानात एकट्याच असताना, भगवे कपडे घातलेले दोन हिंदी भाषिक इसम तेथे आले.

- Advertisement -

महिला यांनी त्यांना सुरुवातीला 10 रुपये दक्षिणा दिली, परंतु भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून गल्ल्यातील पैसे सिद्ध करून देतो असा बहाणा केला. त्यांनी काउंटरबाहेर पैसे आणायला लावून गल्ल्यातील 5,000 रुपये रोख रक्कम हातचलाखीने स्वतःच्या झोळीत टाकली. त्यानंतर महिला यांच्या हातातील 40,000 रुपये किमतीची, पुष्कराज खडा असलेली 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीही सिद्ध करण्याच्या बहाण्याने काढून घेतली व पोबारा केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेनी गुरुवारी (27 ऑगस्ट 2026) राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (इछड) 2023 च्या कलम 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्र. 0345/2026) दाखल केला.

कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब जरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा फोटोच्या आधारे शोध घेतला.कोपरगाव रेल्वे स्टेशन परिसरातून या दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले. यावेळी पोलीस हवालदार कोरेकर व पंडोरे यांनी राहता पोलीस स्टेशनला आणले असून .पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभंग करत आहे.

ताज्या बातम्या

Newasa : नेवाशात भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला

0
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa नेवासा शहरात नगरपंचायत समोरील फळ विक्रीच्या हातगाड्याचे स्थलांतरण करण्यावरून प्रशासकीय मोहिमे दरम्यान तणाव निर्माण झाला. दरम्यान, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या...