Friday, November 8, 2024
Homeक्राईमराहत्यातील तरुणाचा खून, आरोपी जेरबंद

राहत्यातील तरुणाचा खून, आरोपी जेरबंद

दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नसल्याने कृत्य केल्याची कबुली

राहाता |वार्ताहर| Rahata

राहत्यातील 42 वर्षाच्या तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने पोलिसांनी अज्ञान आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गुरुवारी या गुन्ह्यातील आरोपी अनिल विश्वनाथ मोरे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दुसर्‍या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू असून दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नाही म्हणून गणेश कसाब याचा खून केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

राहाता शहरात मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गणेश भाऊसाहेब कसाब या तरुणाला मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी व्यापारी संकुलात नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सफाई महिला कर्मचारी यांना सदर युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मयत युवकाच्या भावाने राहाता पोलीस ठाण्यात या घटनेबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तात्काळ श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांना याबाबत माहिती देऊन तपासाचे चक्र तात्काळ फिरवले असता घटनेतील मयत गणेश कसाब या तरुणाचा गळा दाबून खून केला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या घटनेत दोन आरोपींची नावे पोलिसांना तपासात माहिती झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली की सदर गुन्हा हा अनिल विश्वनाथ मोरे, राहणार साकुरी व त्याचा मित्र या दोघांनी केला असून अनिल मोरे हा निफाड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात आहे.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे व राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी डोंगरगाव शिवारात जाऊन आरोपी अनिल विश्वनाथ मोरे याला सापळा रचून चालाखीने ताब्यात घेतले असता त्याने मी व किरण रामदास वाघ असे आम्ही दोघांनी दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नाही म्हणून वाद झाल्याने आम्ही गणेश भाऊसाहेब कसाब यास मारहाण करून गळा आवळून मारून टाकले. त्यानंतर त्याला राहाता चौकातील छत्रपती व्यापारी संकुलात आणून टाकले, अशी कबुली आरोपी अनिल मोरे यांनी पोलिसांत दिली असून या गुन्ह्यातील दुसर्‍या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला श्रीरामपूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, किरण साळुंखे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दत्तात्रेय हिंगडे , बापूसाहेब फोलाने, हुरकान शेख, आकाश काळे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर तसेच राहाता पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल झिने, नरोडे, गोपीनय शाखेचे विनोद गंभीरे, अनिल गवांदे, सुनील मालकर यांनी सदर घटनेतील आरोपी पकडण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतला होता. राहाता व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध लावून यातील एक आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली त्याबद्दल पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या