Saturday, July 27, 2024
Homeनगरबिजमाता राहीबाई पोपेरे जिजामाता कृषी भवन पुरस्काराने सन्मानित

बिजमाता राहीबाई पोपेरे जिजामाता कृषी भवन पुरस्काराने सन्मानित

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्याचे भूषण आणि जगातील प्रतिभावान महिलांपैकी एक असलेल्या पद्मश्री (Padma Shri) व नारी शक्ती पुरस्काराने (Nari Shakati Award) सन्मानित राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Popere) यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे (Department of Agriculture, Government of Maharashtra) दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषी भूषण पुरस्कार (Jijamata Krishi Bhushan Award) नुकताच प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे हस्ते नाशिक (Nashik) येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

शिल्लक ऊस गाळप नियोजनासाठी जिल्हाधिकारी-कारखानदारांची बैठक

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat), कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal), कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम (Minister of State for Agriculture Vishwajit Kadam) आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शेतकरी सन्मानाचे कौतुक करताना माझा स्वतःचा सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली. शेतकर्‍यांनी काबाड कष्ट करून अन्नधान्य आयात करण्याची गरज ठेवली नाही त्यांचे मी कौतुक करतो. सेंद्रिय शेती करण्याचे त्यांनी गरज व्यक्त केली. माझे राज्य उत्तराखंड येथील शेतकरी मी इकडील शेती दाखवण्यास आणतो, कारण महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात शेतीसाठी उत्कृष्ठ राज्य आहे. उत्तम शेती फक्त महाराष्ट्रातच होवू शकते, याचा गौरव त्यांनी याप्रसंगी केला.

ऑनलाइन मार्गदर्शन करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहीबाई यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी निर्माण केलेल्या गावरान बियाणे बँकेचा उल्लेख करत अभिनंदन केले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासाठी या पुरस्काराची रक्कम वाढवणार असल्याचे नमूद केले. महिला शेतकरी भगिनींना कृषी योजनांमध्ये पन्नास टक्के राखीव ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विकेल ते पिकेल योजेनेचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

उपमुख्मंत्री अजितदादा यांनी यापुढे पुरस्काराची रक्कम पाचपट वाढविण्याची घोषणा व्यासपीठावरून केले. पुण्यात अडीचशे कोटी गुंतवून कृषी भवन उभारले जाणार आहे. शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्राचा जिडीपी फक्त शेती क्षेत्रामुळे टिकून असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझा महाराष्ट्रातील शेतकरी हजार तोंडाच्या राक्षसाशी रोज लढतो. अनेक संकटे झेलून तो न हारता शेती पिकवतो. ई-पीक पाहणी शेतकरी वर्गासाठी शासनाने आणला आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत असल्याचे नमूद केले.राज्य फळ पिकवणारे राज्य म्हणून प्रसिद्ध होत आहे हे अभिमानास्पद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या