Friday, April 24, 2026
HomeनगरKanda Market : राहाता बाजार समितीत कांद्याला आज काय दर मिळाला?

Kanda Market : राहाता बाजार समितीत कांद्याला आज काय दर मिळाला?

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या भावात सुधारणा झाली असून, सर्वोच्च भाव १८५० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. या दिवशी एकूण ८,३७८ गोण्या कांद्याची आवक झाली.

- Advertisement -

कांदा नंबर १ ला १,५०० ते १,८५० रुपये असा दर मिळाला. कांदा नंबर २ साठी १,००० ते १,४५० रुपये दर नोंदवला गेला, तर कांदा नंबर ३ ला ५०० ते ९५० रुपये असा भाव मिळाला. गोल्टी कांद्याला ६०० ते १,२५० रुपये दर, तर जोड कांद्याला ३५० ते ७०० रुपये भाव मिळाला.

भाजीपाला आणि फळांच्या आवक-भावातही चांगली चढ-उतार नोंदवली गेली. डाळिंबाची ९,६५० क्रेट्स आवक झाली. त्यामध्ये नंबर १ डाळिंबाला २२१ रुपये दर मिळाला. नंबर २ साठी १४६ ते २२० रुपये, नंबर ३ साठी ६६ ते १४५ रुपये आणि नंबर ४ साठी १० ते ६५ रुपये भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रूटला ३,५०० ते ५,००० रुपये असा दर असून सरासरी भाव ४,२५० रुपये होता. पेरूच्या २५८ क्रेट्स आवक झाली असून, पेरूला ५०० ते ३,२५० रुपये दर मिळाला. सरासरी दर १,८७५ रुपये नोंदवला गेला.

धान्य व कडधान्याच्या भावातही बदल झाला आहे. बाजरीला सरासरी २,०५१ रुपये दर, तर हरभऱ्याला सरासरी ४,७५५ रुपये भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

IPL 2026 : चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार की ‘डेडलॉक’ सुटणार?...

0
बेंगळुरू । Bengaluru आयपीएल २०२६ चा थरार आता रंगात आला असून, आज क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयटी सिटी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खिळल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स...