Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! चांदवडमधून डॉ. राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली...

मोठी बातमी! चांदवडमधून डॉ. राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) बिगुल वाजले असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान (Voting) तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली असून अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मुलगा झाल्याचे सांगितले अन् सोपवली मुलगी

यात नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) चांदवड-देवळा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार डॉ.राहुल आहेर यांच्याविरोधात त्यांचे बंधू केदानाना आहेर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे डॉ. राहुल आहेर यांची अडचण झाली होती.

हे देखील वाचा : Nashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन

यानंतर आता डॉ. राहुल आहेर (Dr.Rahul Aher) यांनीच भावासाठी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. डॉ.राहुल आहेर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपले बंधू केदानाना (Keda Nana Aher) आहेर यांना आगामी विधानसभेसाठी चांदवड-देवळा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar On Jayant Patil : विधानसभेसाठी जागांचा निर्णय…; शरद पवारांच जयंत पाटलांबाबत मोठं विधान, तर जयंत पाटील म्हणाले,…

दरम्यान, डॉ.राहुल आहेर यांच्या मागणीला पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संमती दर्शविल्याचे बोलले जात आहे. तसेच डॉ. राहुल आहेर यांनी भाऊबंदकीत वाद नको म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता दादा की नाना या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या