Thursday, June 13, 2024
Homeदेश विदेश"निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला (NDA) बहुमत मिळाले असून इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पंरतु, लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये (Stock Market) अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकाला दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता.

यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) “शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असे म्हणत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना विशिष्ट गुंतवणुकीचा सल्ला का दिला? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का? दोघांच्या मुलाखती एकाच मीडियाला का दिल्या गेल्या? हाच उद्योग समूह जो स्टॉकमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीच्या चौकशीत आहे. बनावट एक्झिट पोलर्स आणि एक्झिट पोल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर गुंतवणूक करणाऱ्या संशयास्पद विदेशी गुंतवणूकदारांचा काय संबंध आहे? पाच कोटी पगार दारांची मागणी आहे की हा घोटाळा कोणीतरी भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनी केला आहे आणि मोदी व शाह यांनी खरेदी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी आम्ही आज संयुक्त संसदीय समितीची मागणी करतो, असे राहुल गांधींनी म्हटले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण भारत या मागचे सत्य जाणून घेऊ इच्छित आहे. खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिमाण झाला. नरेंद्र मोदी, अमित शाह, निर्मला सितारामण यांनी शेअर मार्केटवर टिप्पणी केल्यामुळे आधी मार्केट वरती गेलं आणि ४ जून रोजी मार्केट खाली आलं. यामध्ये ४ तारखेला तब्बल ३० लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच हा फक्त अदानी मुद्द्यापेक्षा एक व्यापक मुद्दा आहे. तो अदानी मुद्द्याशी जोडलेला आहे, पण हा खूप व्यापक मुद्दा आहे. हा थेट मोदी, शाह यांची गोपनीयता आहे. वास्तविक निवडणूक निकालांवरील डेटा, कोणाकडे आयबी अहवाल आहेत, कोणाचा स्वतःचा डेटा आहे, जो किरकोळ गुंतवणूकदारांना स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहे,” असेही राहुल गांधींनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या