Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याRahul Gandhi : ... तर शेतकऱ्यांसाठी जीएसटी हटविण्यात येईल; राहुल गांधींचे मोठे...

Rahul Gandhi : … तर शेतकऱ्यांसाठी जीएसटी हटविण्यात येईल; राहुल गांधींचे मोठे आश्वासन

नाशिक | Nashik

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली असून यात्रेचा आजचा राज्यातील तिसरा दिवस आहे. या यात्रेची सुरुवात आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सभेने झाली. या सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह महाविकासआघाडीचे (Maha Vikas Aghadi) महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना राहुल गांधींसह अन्य नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीकेची झोड उठवली…

- Advertisement -

यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, सध्या माध्यमांमध्ये कांद्याच्या दराबाबत कुठलीही चर्चा केली जात नाही. कांद्याचा दर हा सर्वात मोठा मुद्दा असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मौन बाळगून आहे. देशात महागाई, बेरोजगारी, भागिदारी या मोठी समस्या असून सरकारकडून श्रीमंतांची कर्ज माफ केली जातात, मात्र गरिबांची नाही. सरकारने २२ उद्योजकांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले असून देशातील ७० कोटी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती या २० ते २५ धनाढ्य लोकांकडे आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच मनरेगाच्या योजनेसाठी वर्षाला ६५ हजार कोटी रुपये लागतात. त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो. उद्योगपतींना माफ केलेले १६ लाख कोटी रुपये जर या योजनेसाठी वापरले असते तर २४ वर्ष ही योजना चालविता आली असती, असे राहुल गांधींनी म्हटले.

तसेच उद्योगपतींची कर्जमाफी करायची असेल तर शेतकऱ्यांचीही कर्जमाफी करावी लागेल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कायद्याने अमलात आणाव्या लागतील, पिकविमा योजनेची पुर्नरचना केली जाईल, चौथे म्हणजे शेतकरी जेव्हा कांदा विकण्यासाठी आणतो तेव्हा आयात-निर्यात धोरण बदलून त्याचे उत्पन्न घटविले जाते. आमचे सरकार आल्यानंतर आयात-निर्यात धोरणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केले जाईल. शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे कर लागत आहेत. त्यामुळे जीएसटीचा अभ्यास करून शेतकरी जीएसटीच्या बाहेर राहिल, याचा प्रयत्न आम्ही करू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिले. याशिवाय आमच्या सरकारचे दरवाजे सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुले असतील. दिल्लीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकणारे सरकार आहे, हा विश्वास मी देतो. यावेळी राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरही टीका केली. या योजनेमुळे देशातील सैन्यदल खिळखिळे केले आहे.

सरकारचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

सरकारचे कांदा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असून त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून शेतकरी संकटात, कर्जबाजारी झाला आहे. सत्ता नसताना कांद्याला भाव देण्याची मागणी करायची मात्र आता सत्ता आल्यावर सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. सध्या सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याचे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

राहुल गांधी मन की बात सांगत आहेत

मला सध्या इंदिरा गांधी आठवत आहेत. इंदिरा गांधी जेव्हा देशांमध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो ‘इंदिरा गांधी आई है नही रोशनी लाही है’ आज तीच नवी रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशांमध्ये चालत असून लोकांना भेटत आहेत. लोकांशी चर्चा करत असून शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकत आहेत. स्वतःच्या मन की बात फार कमी बोलत आहेत. काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगत आहेत. माझचं ऐका, दुसरे कुणाचे ऐकायचे नाही, असे त्यांचे धोरण असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीं याच्यावर निशाणा साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या