Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजपाध्यक्ष नितीन नबीन यांचा राहुल गांधी आणि CJP वर जोरदार हल्लाबोल; म्हणाले,...

भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांचा राहुल गांधी आणि CJP वर जोरदार हल्लाबोल; म्हणाले, लोकशाही व्यवस्थेला…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीसह देशभरात मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. यासाठी आज कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर वर आंदोलन करणार आहे. त्याआधीच कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंसह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर टीका केली आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी CJP आणि ‘इंडिया’ आघाडीला लक्ष्य केले. या गटांची कथित ‘अराजकतेची स्पर्धा’ यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

“परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर देश अस्थिर करण्याचा प्रयत्न”
नितीन नबीन यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, देशातील १४० कोटी जनता शांतता आणि सलोख्याने राहत असताना काही गट देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित CJP हे दोन गट देशात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन्ही गटांचे उद्देश जनतेला समजले आहेत, असा दावा करत नबीन यांनी राजकीय अजेंड्यासाठी परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर काम केले जात असल्याचा आरोपही केला.

- Advertisement -

अभिजीत दिपकेंना विमानातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “मी अटक करुन…”

राहुल गांधींना लक्ष्य करत नबीन काय म्हणाले?
नवीन यांनी म्हटले की, जनतेने निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारण्याऐवजी विरोधकांकडून देशाच्या शांतीला बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राजकीय पराभवातून निर्माण झालेल्या निराशेमुळे काही पक्ष अशा भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील नागरिक विरोधकांचे हेतू ओळखतात आणि हेच नागरिक विरोधकांच्या या प्रयत्नांना लोकशाही मार्गाने उत्तर देतील, असेही त्यांनी नमूद केले.भारत जागतिक पातळीवरील विविध संकटांचा सामना करत असतानाही विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची आर्थिक प्रगती, स्वावलंबन आणि राष्ट्रीय सामर्थ्य विरोधकांना मान्य नसल्याचा दावा नवीन यांनी केला. भारताला आत्मनिर्भर आणि सक्षम राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम काही पक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संविधानाचा उल्लेख करून लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणे आणि जनतेचा अनादर करणे योग्य नसल्याचे नवीन यांनी म्हटले. देशाचे नेतृत्व जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे असून लोकशाही प्रक्रियेचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले. देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ओवाळणी कोणाला?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत...