Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "देशातील जनतेला केंद्र सरकारकडून चक्रव्यूहात अडकविण्याचे काम सुरु"; राहुल...

Rahul Gandhi : “देशातील जनतेला केंद्र सरकारकडून चक्रव्यूहात अडकविण्याचे काम सुरु”; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून नुकतेच काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरु असून आज काँग्रेसचे खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्र सोडले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Politics : अजित पवारांसह ४१ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने (Central Government) सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही. तसेच दोन ते तीन टक्के लोकांच्या (People) फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले असून सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी सरकारवर केली.

हे देखील वाचा : “समित कदम देवेंद्र फडणवीसांचा खास”; फोटो दाखवत अनिल देशमुख म्हणाले, “त्याला वाय दर्जाची सुरक्षा…”

पुढे बोलतांना गांधी म्हणाले की, महाभारतात (Mahabharat) चक्रव्यूहात अडकवून अभिमन्यूला मारण्यात आले होते. आज २१ व्या शतकातही एक चक्रव्यूह तयार केला जातो आहे. हा चक्रव्यूह कमळाच्या फुलाच्या आकाराचा आहे. त्याचे चिन्ह पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर लावून फिरतात. जे अभिमन्यूबरोबर करण्यात आले, तेच आज देशातील जनतेबरोबर केले जात आहे. देशातील तरूण, शेतकरी, महिला, छोटे उद्योगपती, यांना एका चक्रव्यूहात अडकवले जात आहे, अशी टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.

हे देखील वाचा : Nashik News : व्ही. एन. नाईक संस्थेवर ‘प्रगती’ चा झेंडा; अध्यक्षपदी कोंडाजीमामा आव्हाड विजयी

तसेच अर्थमंत्र्यांनी (Finance Minister) आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, पेपरफुटीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. शिक्षणासाठी (Education) सर्वांत कमी आर्थिक तरतूद करण्यात आली. ट‍‌ॅक्स टेरिरिझम रोखण्यासाठी सरकारने काहीही केलेले नाही.त्याबरोबरच सरकारने तयार केलेल्या चक्रव्यूहात पंतप्रधान मोदी, मोहन भागवत, अजित डोवाल, अमित शाह, अदानी आणि अंबानी हे सहा जण काम करत असून ते देश चालवत आहेत. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे, असेही राहुल गांधींनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...