Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशRahul Defamation Case : 'त्या' प्रकरणातील राहुल गांधींची याचिका मंजूर ; सर्वोच्च...

Rahul Defamation Case : ‘त्या’ प्रकरणातील राहुल गांधींची याचिका मंजूर ; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

मुंबई | Mumbai

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘मोदी आडनाव’ बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या (Gujarat High Court) आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंजूर केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात २१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला होता. मात्र हायकोर्टाच्या या निर्णयाला राहुल गांधी सुप्रीम कोर्टात आव्हान देत हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आता ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांच्यासमोर याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीशांनी हे प्रकरण शुक्रवारी सुनावणीसाठी लिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरत न्यायालयाने (Surat Session Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवून २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल घेतली होती. यावर गेल्या ७ जुलैला गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना कोणाताही दिलासा दिला नव्हता. तर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली होती.

“जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला…”; किरीट सोमय्यांच्या Viral Video प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण

राहुल गांधी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात आपल्या भाषणात म्हटले होते की, ‘सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का आहे?’ यावरुन भाजपचे नेते पुर्णेश मोदी यांनी सूरत कोर्टात त्यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘राहुल गांधी यांनी असे म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.’ याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत राहुल गांधी यांना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायलायाने त्यांना जामीन सुद्धा मंजूर केला होता आणि उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा देण्यासाठी ३० दिवसांची शिक्षा स्थगित केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या