Friday, June 14, 2024
Homeदेश विदेशबराक ओबामांच्या आत्मचरित्रात राहुल गांधींचा उल्लेख, म्हणाले...

बराक ओबामांच्या आत्मचरित्रात राहुल गांधींचा उल्लेख, म्हणाले…

दिल्ली l Delhi

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबत उल्लेख केला आहे.

या पुस्तकात काँग्रेसचे युवानेते राहुल गांधी यांचा उल्लेख चिंताग्रस्त आणि अपरिपक्व व्यक्ती असे म्हंटले आहे. त्याचबरोबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांचाही या पुस्तकात ओबामा यांनी उल्लेख केला आहे.

ओबामांनी राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबाबत बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, बॉब गेस्ट (अमेरिकेचे संरक्षण सचिव) आणि मनमोहन सिंह यांच्यात बरेच साम्य आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांच्याबाबत ओबामा यांनी म्हटले आहे की, आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांच्यासारख्या हँडसम पुरुषांबाबत सांगितले जाते. परंतू, महिलांच्या सौदर्याबद्दल सांगितले जात नाही. त्यासाठी एक किंवा दोन उदाहरणेच पुरेसी आहेत. जसे की सोनिया गांधी.

ओबामा यांच्या पुस्तकातील अंशांचा उल्लेख नायजेरियाच्या लेखक चिमांडा नोगजी आदिचि यांनी आपल्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तक समीक्षेत आहे. राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या व्यतिरिक्त या पुस्तकात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांचाही उल्लेख आहे. बराक ओबामा यांचे पुस्तक त्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा त्यांच्या राजकीय भूमिकेवर अधिक केंद्रित आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी राजकारणाच्या त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ओसामा बिन लादेनच्या हत्येपर्यंत अनेक मुद्द्यांविषयी लिहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या