Monday, April 21, 2025
HomeराजकीयRahul Gandhi : राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा; म्हणाले, "निवडणूक...

Rahul Gandhi : राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा; म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेत गंभीर…”

दिल्ली । Delhi

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर शंका उपस्थित करत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं उदाहरण देत थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

- Advertisement -

राहुल गांधी बोस्टनमधील एका विद्यापीठात झालेल्या चर्चासत्रात बोलत होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेतील आकडे संशयास्पद आहेत. “सायंकाळी साडे पाच वाजता आम्हाला दिलेल्या आकड्यांनंतर, पुढील दोन तासांत तब्बल 65 लाख मते पडली,” असा दावा त्यांनी केला.

राहुल म्हणाले, “मतदान प्रक्रियेला सरासरी तीन मिनिटे लागतात. अशा वेगात 65 लाख मते पडणे अशक्य आहे. यासाठी तर मतदारांना रात्री दोन वाजेपासून रांगेत उभं राहायला हवं होतं, पण तसं काही घडलं नाही.”

त्यांनी यासंदर्भात व्हिडिओग्राफी मागितली होती, पण निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला, अशी माहितीही राहुल गांधींनी दिली. इतकंच नव्हे, तर “व्हिडिओ मागण्यास प्रतिबंध करणारा कायदा बदलण्यात आला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर चार आरोप

  • पाच वर्षांत लोकसभा निवडणुकीसाठी 32 लाख मतदार जोडले गेले, पण त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत विधानसभेसाठी 39 लाख नवीन मतदार नोंदले गेले.
  • पाच महिन्यांत इतके जास्त मतदार कसे नोंदवले गेले, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
  • राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा नोंदणीकृत मतदार जास्त कसे काय झाले? यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
  • कामठी मतदारसंघाचे उदाहरण देत राहुल म्हणाले की, भाजपच्या विजयाचे अंतर तेथील नव्या मतदारांच्या संख्येइतकेच आहे.

राहुल गांधींनी याआधीही फेब्रुवारी महिन्यात पत्रकार परिषद घेऊन हेच मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीपूर्वी 32 लाख आणि विधानसभेपूर्वी 39 लाख नवीन मतदारांची नोंद झाली. म्हणजे पाच महिन्यांत सात लाख मतदार वाढले.” काँग्रेसने मतदार यादीसह, त्यातील नावं आणि पत्त्यांची माहिती मागवली आहे. त्यांनी असेही म्हटले की, “अनेक दलित आणि अल्पसंख्यांक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. आम्ही कोणावर थेट आरोप करत नाही, पण काहीतरी गडबड झाली आहे हे नक्की.”

राहुल गांधींच्या आरोपांव्यतिरिक्त, काँग्रेसने हरियाणातील ऑक्टोबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही संशय व्यक्त केला होता. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा दावा केला होता. खेरा म्हणाले की, “20 जागांवर मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड आढळून आला. ज्या मशीनमध्ये 99 टक्के बॅटरी चार्ज होती, त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हरले, आणि जिथे 60-70 टक्के चार्ज होती, तिथे आमचे उमेदवार जिंकले.” त्यांनी मागणी केली की अशा मशीन सील करून तपास होईपर्यंत सुरक्षित ठेवाव्यात.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Gold Price : सोन्याचा भाव नव्या उच्चांकावर; ओलांडला एक लाखाचा टप्पा,...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांत सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराने (Gold Rate) आज (सोमवारी) १ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांचा खिसा...