Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशआरएसएसच्या हातात आसाम जाऊ देणार नाही – राहुल गांधी

आरएसएसच्या हातात आसाम जाऊ देणार नाही – राहुल गांधी

गुवाहाटी – आसामची भाषा, इतिहास आणि संस्कृतीवर आम्ही भाजपा आणि आरएसएसला आक्रमण करू देणार नाही. आसामवर नागपूरचे नियंत्रण येऊ देणार नाही. आरएसएसच्या चड्डीवाल्यांच्या हातात आसाम जाऊ देणार नाही, असे नमूद करतानाच आसामची सत्ता नागपूर आणि आरएसएसचे चड्डीवाले चालविणार नाहीत, तर आसामची जनताच चालविणार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.

गुवाहाटी येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान काँग्रेसच्या स्थानपादिनी (28 डिसेंबर) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसने शनिवारी देशभर विरोध प्रदर्शन केले. विविध राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये संविधान बचाओ-भारत बचाओ मार्च आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी यावेळी ठिकठिकाणच्या हिंसक आंदोलनांचा दाखला देत देशात पुन्हा एकदा नोटबंदीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या देशात जे काही घडत आहे त्यामागे भाजप सरकारचा कुटील डाव आहे. लोकांना आपसात लढवण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. हे जिथे जातात तिथे केवळ द्वेष पसरवण्याचेच काम करतात, आसाममध्ये भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही.

द्वेष आसामला मान्य नसून येथील जनता शांततेचा मार्ग चोखाळून बंधुभाव जपूनच पुढे मार्गक्रमण करेल, आसामध्ये युवावर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. संपूर्ण देशात हेच वातावरण आहे. मात्र, आंदोलकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. जनतेचा आवाज भाजपला ऐकायचा नाहीय. तुमच्या आवाजाची भीती या सरकारला वाटतेय. तुमचा आवाज दाबून टाकण्याचे धोरण या सरकारने आखलेय, असेही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...