Wednesday, October 14, 2026
Homeदेश विदेशRahul Gandhi: ‘जंतर-मंतर परत मिळवू’; राहुल गांधी CJPच्या समर्थनार्थ मैदानात, दोन नेत्यांच्या...

Rahul Gandhi: ‘जंतर-मंतर परत मिळवू’; राहुल गांधी CJPच्या समर्थनार्थ मैदानात, दोन नेत्यांच्या कोठडीवरून केंद्रावर टीका

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जंतर मंतर येथे परवानगीशिवाय प्रवेश करत तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाला पाठिंबा देत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. CJPचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रिया दिली. “जंतर-मंतर हे भारतातील जनतेचे आहे. आम्ही ते परत मिळवू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा गुन्हा नसल्याचे सांगत त्यांनी तरुण नेत्यांना तुरुंगात पाठवण्याच्या निर्णयावरही आक्षेप घेतला.

- Advertisement -

जंतर मंतर या आंदोलनासाठी बंदी घातलेल्या मैदानात परवानगीशिवाय घुसून घोषणाबाजी करणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टीच्या तीन प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना आज मंदिर मार्ग येथील विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

राहुल गांधींनी काय पोस्ट केली आहे?
राहुल गांधी म्हणाले, “जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करताना तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही. पण तरुणांना तुरुंगात डांबणं हा भ्याडपणा आहे. तरुण, विद्यार्थी, पत्रकार, इंडिया आघाडी. हे विविध बॅनर असले तरीही त्यांच्या आंदोलनाचं कारण एकच आहे. सर्व आंदोलक एक आहेत. नागरिक त्यांचे मुलभूत अधिकार मागत आहेत. जंतर मंतर हे भारतीय नागरिकांचं आहे. त्यामुळे ते आम्ही परत मिळवूच”, असं राहुल गांधी म्हणाले.

Waving the Tricolour at Jantar Mantar in a peaceful protest is not a crime. Jailing youth for it is an act of cowardice.

Students. Youth. Journalists. The INDIA bloc. Different banners, one cause. All protests are one: citizens demanding their constitutional rights.

Jantar Mantar belongs to the people of India. We will reclaim it.— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 14, 2026

अभिजीत दिपके काय म्हणाले?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके म्हणाले की, “अशुतोच रांका आणि सौरव दास यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांचा गुन्हा काय? जंतरमंतरवर तिरंगा फडकवणे. विरोधाचा आवाज दडपण्याचा इतकाच निर्धार असेल, तर अशा भ्याड मार्गांचा अवलंब करण्याऐवजी अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करण्याचे धाडस दाखवा.” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारला आव्हान केले आहे.

नेमकं प्रकरण काय?
कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना 5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात बळजबरीने प्रवेश केल्याप्रकरणी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह सीजेपीच्या इतर 3 नेत्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत मंगळवारी (13 ऑक्टोबर) रात्री तब्बल 3 वाजता ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (14 ऑक्टोबर) सकाळी तिघांनाही प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांना वगळता इतर दोन नेत्यांना सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

ताज्या बातम्या

SIR

मतदारयादीतील तपशील आजच तपासा अन्…! मुख्यमंत्र्यांकडून SIR बाबतचे गैरसमज दूर करण्याचा...

0
मुंबई | Mumbaiमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील आंदोलनाला राजकीय वळण मिळत असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांसह कॉकरोच जनता पार्टी (CJP)...