Friday, November 22, 2024
HomeराजकीयRahul Gandhi : कोल्हापूरात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्याच्या कौलारु घरात पाहुणचार; कुटुंबीय...

Rahul Gandhi : कोल्हापूरात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्याच्या कौलारु घरात पाहुणचार; कुटुंबीय भारावले

कांद्याची पात अन् वांग्याच्या भाजीवर मारला ताव

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra tour) होते. त्यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे (Statue) अनावरण झाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली होती. त्यावेळी त्यांची ही यात्रा प्रचंड चर्चेत आली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा

राहुल गांधींच्या या हजारो किलोमीटरच्या प्रवासात त्यांच्या साधेपणाचे, हळव्या स्वभावाचे, कार्यकर्त्यांशी दिलखुलास संवाद साधण्याचे अनेक किस्से गाजले होते. तसेच सोशल मीडियावर (Social Media) या यात्रेतील ‘मोहब्बत की दुकान’ असे नाव दिलेल्या खास क्षणांची जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये आपल्या साधेपणाने लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे मने जिंकतांना पाहायला मिळत आहे. राहुल गांधींची ही वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या या साधेपणाचा प्रत्यय आज कोल्हापूर दौऱ्यात (Kolhapur Tour) देखील पाहायला मिळाला.

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “आमचे सरकार आल्यानंतर महिनाभरात तुमचा हिशोब…”; उद्धव ठाकरेंचा महायुतीला थेट इशारा

राहुल गांधी हे आज कसबा बावडा (Kasaba Bawda) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी जाणार होते. मात्र, त्यांनी कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर नियोजित दौऱ्याला बगल देत एका काँग्रेस कार्यकर्त्याच घर गाठले. सकाळी साडे आठ वाजता राहुल गांधी यांचे कोल्हापुर विमानतळावर (Kolhapur Airport) आगमन झाले. विमानतळावर उतरताच राहुल गांधी कोल्हापूरच्या उचगाव (Uchgaon) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी गेले. अजित संधे हे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते तसेच टेम्पोचालक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधी भेटीसाठी आल्याचे समजताच परिसरात त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

त्यानंतर राहुल गांधी यांनी अजय सनदे (Ajay Sande) यांच्या कौलारु घरात जाऊन पाहुणचार घेतला. सनदे यांच्या घरी राहुल गांधी तासभर होते, यावेळी त्यांनी सनदे कुटुंबाशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर राहुल गांधी यांनी अजय सनदे यांच्या घरी स्वत:स्वयंपाक देखील केला. राहुल गांधी यांनी स्वत:च्या हाताने जेवणाला कांद्याची पात आणि वांग्याची भाजी असा बेत बनवला होता, ज्यावर त्यांनी तावही मारला. राहुल गांधींच्या या कृतीने सनदे कुटुंबीय अक्षरक्ष भारावून गेले. तसेच राजकीय वर्तुळातही राहुल गांधी यांच्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या