Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशराहुल गांधी 'या' लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार; युपी काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

राहुल गांधी ‘या’ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार; युपी काँग्रेस अध्यक्षांची घोषणा

अमेठी | Amethi

देशातील सर्व राजकीय पक्ष लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तयारीला लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून (Amethi Constituency) लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) लढवणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय (UP Congress Chief Ajay Rai) यांनी केली आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अजय यांनी यावेळी अजय राय यांनी अमेठीबाबत मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी प्रियंका गांधींबाबत सांगितले की, जर प्रियंका गांधी यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर, त्या वाराणसीमधून निवडणूक लढू शकतात.

CAG Report 2023: नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठीच कॅगचा अहवाल; काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक आरोप

त्यांच्यासाठी आमचे कार्यकर्ते काहीही करायला तयार आहेत. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. अमेठी मतदार संघात राहुल गांधी यांचा स्मृती ईराणी यांनी पराभव केला होता.

प्रियंका गांधी जिथे म्हणतील तिथे आम्ही राहुल गांधी यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचवेळी राय यांनी स्मृती इराणींवर हल्लाबोल करताना म्हटले, इराणी म्हणाल्या होत्या की, कमळाचे बटण दाबा, तुम्हाला १३ रुपये किलोने साखर मिळेल. मात्र ती अजुनही मिळाली नाही.

युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा आरोप भाजपा नेते आशिष शेलारांवर आरोप; म्हणाले…

बेरोजगारी, महागाई आणि लोकांना घाबरवून आपल्यासोबत घेणे या राज्यातील सर्वात मोठ्या समस्या आहेत. ते लोकांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजुने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजय राय म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जो प्रेमाचा संदेश दिला तो संदेश काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घराघरात पोहोचवतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतात मोठा धक्का! ‘या’ खेळाडूवर चार वर्षांची बंदी, होती पदकाची आशा

अमेठी लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस कुटुंबियांचे खास नाते आहे. याच मतदारसंघातून याआधी संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. राहुल गांधी यांनीही सलग तीन वेळा अमेठी मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या