धुळे | Dhule
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज या यात्रेचा राज्यातील दुसरा दिवस असून ही यात्रा धुळे (Dhule) जिल्ह्यात दाखल झाली आहे. धुळ्यातील दोंडाईचा येथे सुरुवातीला आज राहुल गांधींची भव्य रॅली झाली. यानंतर ही यात्रा धुळे शहरात दाखल झाली. यावेळी धुळे शहरात महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यामधून राहुल गांधींनी केंद्रातील भाजप (BJP) सरकारवर जोरदार हल्लाबोल करत महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या…
यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसचे (Congress) सरकार सत्तेवर आल्यास महिलांना (Women) सर्वेक्षण न करता आरक्षण (Reservation) दिले जाईल. तसेच सर्व गरीब महिलांच्या बँक खात्यामध्ये एक लाख रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येईल. याशिवाय अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या आशा सेविकांसाठी केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करण्यात येईल. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह उघडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले.
Nashik News : सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकाला मारहाण
पुढे ते म्हणाले की, देशात जी २२ लोक आहेत त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच ७० कोटी लोकांकडे आहे. मनरेगासाठी २४ वर्षांसाठी जितके बजेट लागते तितकीच कर्ज माफी मोदी सरकारने १६ लाख करोड रुपये २२ उद्योगपतींना दिले आहेत, असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. तसेच देशात ५० टक्के मागास लोक असून यात १५ टक्के दलित आहेत. तर १५ टक्के अल्पसंख्याक आणि ८ टक्के आदिवासी लोक आहेत. त्यामुळे जोपर्यंत जनगणना होणार नाही तो पर्यंत लोकांचा विकास होणार नाही, असेही राहुल गांधींनी सांगितले.
तसेच देशाचे सरकार केवळ ९० लोक चालवत असून हे लोक आयएएस अधिकारी आहेत. यात दलित केवळ ३ जण असून एकही आदिवासी नाही. १५ टक्के दलित असतांना बजेटमध्ये त्यांची भागीदारी फक्त १ टक्का आहे. त्यामुळे हे सर्व थांबविण्यासाठी मागील वर्षी कन्या कुमारीपासून आम्ही ४ हजार किलोमीटरपर्यंत चालत ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. त्यानंतर आता मणिपूरपासून (Manipur) ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली, असे राहुल गांधी म्हणाले.