Sunday, October 4, 2026
HomeनगरRahuri : राहुरी विद्यापीठात नवीन पायर्‍यांचा स्लॅब कोसळून परप्रांतीय मजूर ठार

Rahuri : राहुरी विद्यापीठात नवीन पायर्‍यांचा स्लॅब कोसळून परप्रांतीय मजूर ठार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पायर्‍यांसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक परप्रांतीय मजूर जागीच ठार झाला. ही घटना 26 जुलै रोजी राहुरी विद्यापीठ येथे घडली आहे. राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालू आहे. सदर बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे.

- Advertisement -

भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायर्‍या बनवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्लॅब टाकला होता. काल, दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान विकासकुमार छेदीलाल, रा. फत्तेपूर, उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅब खालील प्लेट खोदत असताना अचानक सर्व पायर्‍या त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला. रुग्णवाहिकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी विकासकुमार छेदीलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

ताज्या बातम्या

Shrirampur : अखेर बेग, जेधे टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर येथील बेग, जेधे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार...