Tuesday, July 28, 2026
HomeनगरRahuri Assembly Bypoll Election Result : राहुरीत सहावी फेरी पूर्ण, अक्षय कर्डिलेंना...

Rahuri Assembly Bypoll Election Result : राहुरीत सहावी फेरी पूर्ण, अक्षय कर्डिलेंना किती मते?

राहुरी । प्रतिनिधी

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढत असून, सहाव्या फेरीअखेर त्यांनी विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे.

- Advertisement -

सहाव्या फेरीअखेर प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपचे अक्षय कर्डिले यांना २९,९०३ मते मिळाली आहेत. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे गोविंद मोकाटे यांना अवघी ४,४१७ मते मिळाली आहेत. कर्डिले यांनी तब्बल २५,४८६ मतांची निर्णायक आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

या निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्येच होती. मात्र, सुरुवातीपासूनच कर्डिले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी शांततेत सुरू असून, लवकरच या मतदारसंघाचा अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे. सध्या तरी राहुरीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत ‘कमळ’ फुलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? दिल्लीतील सलग बैठकींमुळे...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्र राजकारणाच्या पटावर सध्या अत्यंत वेगवान आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी घडत आहेत. मागील काही दिवसांपासून शांत वाटणाऱ्या राजकीय वर्तुळात आता अचानक मोठा...