Wednesday, May 6, 2026
HomeनगरRahuri By-Election Results : राहुरीत दुसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी!

Rahuri By-Election Results : राहुरीत दुसऱ्या फेरीअखेर अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी!

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू झाली आहे. मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असतानाच, सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे.

- Advertisement -

टपाल मतमोजणीपासूनच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले वर्चस्व राखले होते. त्यानंतर ईव्हीएम (EVM) च्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीअखेर प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल ९,६३७ मतांची लक्षणीय आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी मिळवलेल्या मतांमुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे गोविंद मोकाटे, तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह एकूण सात उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार असून, त्यापैकी १ लाख ८७ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत सरासरी ५६.२० टक्के मतदान झाले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीने सुरू असून, सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत या मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुरीचा नवा आमदार कोण होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

गोदावरी महाआरती : नद्या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नद्या या केवळ जलधारा नाहीत. त्या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार आहेत. आपल्या परंपरा, संस्कार, सण-उत्सव आणि सामाजिक जीवन हे नद्यांशी घट्ट जोडलेले...