राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी-नगर- पाथर्डी विधानसभा पोटनिवडनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी 1 लाख 40 हजार मते मिळवून प्रतिस्पधी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा तब्बल 1 लाख 12 हजार 587 मतांनी दारूण पराभव केला. गोविंद मोकाटे यांना 27 हजार 506 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7 हजार 299 व वंचितचे संतोष चोळके यांना 5 हजार 690 मते मिळाली.
या निवडणुकीत सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी सहा उमेदवारांची अनामत जप्त झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदानाच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना रेकॉर्डब्रेक मतदान केले. राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला काल सकाळी 8 वाजता राहुरीच्या धुमाळ महाविद्यालयात प्रारंभ झाला. टपाली मतदानापासूनच भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेण्यास सुरूवात केली. टपाली मतदानात कर्डिले यांना 283 तर गोविंद मोकाटे यांना 56 मते मिळाली.
राहुरी तालुक्यातील बुथ क्र. 1 ते 14 च्या पहिल्या फेरीत कर्डिले (4988) तर मोकाटे (722), खेवरे (109), चोळके (356) मते मिळाली. दुसर्या फेरीत बुथ क्र. 15 ते 28 च्या मतमोजणीत कर्डिले (6083), मोकाटे (712), खेवरे (266), चोळके (456) मते मिळाली. तिसर्या फेरीत बुथ क्र. 29 ते 42 च्या मतमोजणीत कर्डिले (5781), मोकाटे (707), खेवरे (784), चोळके (210) मते मिळाली. बुथ क्र. 43 ते 56 च्या मतमोजणीत कर्डिले (3997), मोकाटे (584), खेवरे (446), चोळके (152) अशी मते मिळाली. चौथ्या फेरी अखेर अक्षय कर्डिले यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 18 हजार 113 मताधिक्याने आघाडीवर होते.
पाचव्या फेरीत बुथ क्र. 57 ते 70 च्या मतमोजणीत कर्डिले (4559), मोकाटे (796), खेवरे (373), चोळके (264) अशी मते मिळाली. सहाव्या फेरीत बुथ क्र. 71 ते 84 च्या मतमोजणीत कर्डिले (4495), मोकाटे (895), खेवरे (439) तर चोळके (740), सातव्या फेरीत बुथ क्र. 95 ते 98 च्या मतमोजणीत कर्डिले (5173), मोकाटे (984), खेवरे (301), चोळके (681) तसेच आठव्या फेरीत बुथ क्र. 99 ते 112 च्या मतमोजणीत कर्डिले (4569), मोकाटे (1022), खेवरे (1174) तर चोळके यांना 80 मते मिळाली. आठव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी 33 हजार 222 मतांची आघाडी घेतली.
नवव्या फेरीत बुथ क्र. 113 ते 126 च्या मतमोजणीत कडिले (5144), मोकाटे (1112), खेवरे (692) तर चोळके 213, बुथ क्र. 127 ते 140 च्या दहाव्या फेरीत कर्डिले (5167), मोकाटे (934), खेवरे (307) व चोळके (555), आकराव्या फेरीत बुथ क्र. 141 ते 154 च्या मतमोजणीत कर्डिले (5811), मोकाटे (983), खेवर (1085) तर चोळके (443), बुथ क्र. 155 ते 168 च्या बाराव्या फेरीत कर्डिले (5268), मोकाटे (1400), खेवरे (295), चोळके (84) अशी मते मिळाली. बाराव्या फेरी अखेर अक्षय कर्डिलेंनी 50 हजार 273 मतांची निर्णायक आघाडी घेतली.
बुथ क्र. 169 ते 182 च्या मतमोजणीच्या तेराव्या फेरीत कर्डिले (5072), मोकाटे (1008), खेवरे (705) व चोळके (311), चौदाव्या फेरीच्या बुथ क्र. 183 ते 196 मतमोजणीत कर्डिले (4724), मोकाटे (864), खेवरे (254) तर चोळके (125), पंधराव्या फेरीत बुथ क्र. 197 ते 210 च्या मतमोजणीत कर्डिले (5331), मोकाटे (881), खेवरे (145) व चोळके (126) तर सोळव्या फेरीत बुथ क्र. 211 ते 224 च्या मतमोजणीत कर्डिले (4249), मोकाटे (1040), खेवरे (382) तर चोळके (51) मते मिळाली. सोळाव्या फेरी अखेर कर्डिले यांनी 65 हजार 856 मतांची आघाडी मिळवली.
सतराव्या फेरीत बुथ क्र. 225 ते 238 च्या मतमोजणीत कर्डिले (5224), मोकाटे (984), खेवरे (44), चोळके (54), आठराव्या फेरीच्या बुथ क्र. 239 ते 252 मतमोजणीत कर्डिले (5003), मोकाटे (2263), खेवरे (34) तर चोळके (52), बुथ क्र. 253 ते 266 च्या एकोणाविसाव्या फेरीत कर्डिले (4346) मोकाटे (3113), खेवरे (27) तर चोळके (76), विसाव्या फेरीत बुथ क्र. 267 ते 280 च्या मतमोजणीत कर्डिले (4240), मोकाटे (826), खेवरे (28), तर चोळके (20) अशी मते मिळाली. विसाव्या फेरी अखेर कर्डिले यांनी एकुण 99 हजार 224 मते मिळवून 77 हजार 483 मताधिक्य मिळवत आघाडी घेतली.
एकविसाव्या फेरीत बुथ क्र. 281 ते 294 च्या मतमोजणीत कर्डिले (5497), मोकाटे (660), खेवरे (25), चोळके (40), बुथ क्र. 295 ते 308 च्या बावीसाव्या फेरीत कर्डिले (4991), मोकाटे (1058), खेवरे (30) व चोळके (45), तेविसाव्या फेरीत बुथ क्र. 309 ते 322 च्या मतमोजणीत कर्डिले (6143), मोकाटे (1417), खेवरे (20), चोळके (80) तसेच चोविसाव्या फेरीत बुथ क्र. 323 ते 336 च्या मतमोजणीत कर्डिले (6291), मोकाटे (616), खेवरे (15), चोळके (80) अशी मते मिळाली. चोविसाव्या फेरी अखेर कर्डिले यांनी 96 हजार 654 मतांची आघाडी घेऊन विजयाचा शिक्कामोर्तब केला.
पंचविसाव्या फेरीत बुथ क्र. 337 ते 350 च्या मतमोजणीत कर्डिले (7385), मोकाटे (794), खेवरे (13), चोळके (113), सव्वीसाव्या फेरीच्या बुथ क्र. 351 ते 364 च्या मतमोजणीत कर्डिले (4915), मोकाटे (675), खेवरे (11), चोळके (111), अखेरच्या सत्ताविसाव्या फेरीत बुथ क्र. 365 ते 378 च्या मतमोजणीत कर्डिले (4483), मोकाटे (369), खेवरे (19), चोळके (130) अशी मते मिळाली. अंतिम फेरी अखेर भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी 1 लाख 40 हजार 93 मते घेऊन प्रतिस्पधी उमेदवाराचा 1 लाख 12 हजार 587 मतांनी पराभव केला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करून जल्लोष साजरा केला.
उमेदवारांना मिळालेले एकूण मतदान-
अक्षय शिवाजीराव कर्डिले (1,40, 093), गोविंद खंडू मोकाटे (27,506), संतोष एकनाथ चोळके (5690), अॅड. अथर्व साहेबराव म्हसे (1148), रावसाहेब सदाराम खेवरे (7299), सुरेश दत्तात्रय लांबे (1386), महेश केशव हापसे (2051), नोटा (1632). एकुण मते- (1,86,787).
राहुरी मतदारसंघासाठी आजचा दिवस खर्या अर्थाने ऐतिहासिक आहे. जनतेने दिलेला कौल हा केवळ निवडणुकीचा निकाल नसून लोकांच्या मनातील विश्वास, अपेक्षा आणि आशीर्वाद यांचे प्रतीक आहे. या निकालातून मतदारांनी विकासाच्या वाटचालीला दिलेली पसंती स्पष्टपणे दिसून येते. स्व. शिवाजी कर्डिले यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे योगदान आजही जनतेच्या मनात दृढपणे कोरलेले आहे. त्यांचा विचारांचा वारसा आता अक्षय कर्डिले यांच्या रूपाने पुढे चालू राहिल. कर्डिले यांना दिलेले विक्रमी मताधिक्याबद्दल राहुरीच्या जनतेचे मनःपूर्वक आभार.
– राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री
विजयानंतर अक्षय कर्डीले काय म्हणाले?
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले कि, “आज माझे वडील असते तर खूप आनंद झाला असता. मला ज्यांनी ज्यांनी मदत केली मी त्यांना कधी विसरू शकत नाही. हा विजय म्हणजे शिवाजी कर्डिले साहेबांवर जनता किती प्रेम करते हे या मताच्या माध्यमातून दिसले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केले, तसाच माझा देखील शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच राहील. येत्या काळात सर्वांना मदत करणार” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राहुरी मतदारसंघाच्या जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला कौल ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहे. स्व. शिवाजी कर्डिले यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच उत्तरदायित्वाची बाब आहे. मी स्वतःला केवळ आमदार म्हणून न पाहता, जनतेचा सेवक म्हणून कार्य करण्यावर माझा भर राहील. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा निर्धार आहे. जनतेने दिलेला हा विश्वास आणि आशीर्वाद मी सदैव जपेन आणि स्व. शिवाजी कर्डिले यांच्या विचारांना पुढे नेत राहुरी मतदारसंघात विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा माझा दृढ संकल्प आहे.
– अक्षय कर्डिले, नवनिर्वाचित आमदार




