Wednesday, May 6, 2026
HomeराजकीयRahuri Election Result : राहुरीत अक्षय कर्डिले यांची सुसाट आघाडी; शरद पवार...

Rahuri Election Result : राहुरीत अक्षय कर्डिले यांची सुसाट आघाडी; शरद पवार गटाला मोठा धक्का

राहुरी । प्रतिनिधी

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच एकतर्फी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणिक सुसाट वाढत असून, अकराव्या फेरीअखेर त्यांनी विजयाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला आहे.

- Advertisement -

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच कर्डिले यांचे वर्चस्व दिसून येत होते. १२ व्या फेरीअखेर मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, अक्षय कर्डिले यांना एकूण ६१,०३५ मते मिळाली आहेत. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आणि शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना केवळ १०,७६२ मतांवर समाधान मानावे लागले आहे. या फेरीअखेर कर्डिले यांनी तब्बल ५०,२७३ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

बाराव्या फेरीअखेरची स्थिती:

  • अक्षय कर्डिले (भाजप): ६१,०३५ मते
  • गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी SP): १०,७६२ मते
  • रावसाहेब खेवरे (अपक्ष): ५,८९६ मते
  • संतोष चोळके (वंचित): ४,२३४ मते
  • नोटा (NOTA): ७६१ मते

बाराव्या फेरीत कर्डिले यांना ५,२६८ मते मिळाली, तर मोकाटे यांना केवळ १,४०० मते मिळवता आली. मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष सुरू केला आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, आता केवळ औपचारिकता उरल्याची चर्चा राहुरीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...