Wednesday, September 16, 2026
Homeक्राईमRahuri Crime News : स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार ATM मशीन फोडले;...

Rahuri Crime News : स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार ATM मशीन फोडले; संशयित ताब्यात

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी शहराच्या (Rahuri City) मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चार एटीएम (ATM) मशीन आज (गुरुवारी) सकाळी एका इसमाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली .

- Advertisement -

आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास नगर मनमाड रस्त्यावर (Nagar-Manmad Road) असलेल्या स्टेट बँकेच्या राहुरी शाखेच्या आवारात चार एटीएम मशिन्स असून आज सकाळी एका इसमाने एटीएम मध्ये घुसून चारही एटीएम मशिन वर दगड टाकून फोडले .

या एटीएम सेंटरमध्ये दोन सीडीएम (कॅश भरणा ) व दोन एटीएम असून एटीएम फोडल्यानंतर आजूबाजूच्या ग्राहकांनी तात्काळ बँक अधिकारी व सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधला. या माथेफिरूला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांना (Police) कळविण्यात आले. लाखो रुपयांचे हे एटीएम मशीन असून, राहुरी पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

हरेगावच्या खंडकरी शेतकर्‍यांना जमिनी परत मिळणार

0
मुंबई |प्रतिनिधी| Mumbai श्रीरामपूर तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) हरेगाव मळा येथील शेती महामंडळाकडील जमिनी मूळ शेतकर्‍यांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल...