Monday, May 5, 2025
Homeनगरगुहा गावात धार्मिक वाद पुन्हा उफाळला! पुजारी व भाविकांना मारहाण, पोलिसांचा मोठा...

गुहा गावात धार्मिक वाद पुन्हा उफाळला! पुजारी व भाविकांना मारहाण, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

राहुरी । प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज पुन्हा उफाळून आला असून अमावस्यानिमित्त सुरू असलेल्या पुजा व धार्मिक कार्यक्रमात एका समाजाच्या पुरूष व महिलांच्या जमावाने शिरून पुजारी व भाविकांना मारहाण केल्याने गुहा गावात तणाव निर्माण झाला आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षापासून गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनाने दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न ही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला.

परंतू, आज दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्यानिमित्त पुजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला व भाविकांना दुसऱ्या समाजातील लोकांनी महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण केली. या घटनेमुळे गावात दोन समाजात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : जिल्ह्यातील ‘या’ भागात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी;...

0
नाशिक | Nashik राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असून, अवकाळीचे ढगही घोंघावत आहेत. आज (सोमवारी) जिल्ह्यातील मनमाड आणि पानेवाडी (Manmad and Panewadi Area) परिसरात...