Saturday, July 27, 2024
Homeनगरराहुरी सायकलींगकडून 456 किमीचे अंतर तीन दिवसात पार

राहुरी सायकलींगकडून 456 किमीचे अंतर तीन दिवसात पार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पर्यावरण, आरोग्य आणि साहस या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबतर्फे राहुरी ते एकतेचा पुतळा केवडिया, गुजरात अशा सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या 456 किलोमीटरचे अंतर अवघे तीन दिवसांमध्ये पार केले. या मोहिमेत क्लबच्या 11 सदस्यांनी सहभाग नोंदविला, अशी माहिती क्लबचे संस्थापक अध्यक्ष अरुण ताकटे यांनी दिली.

- Advertisement -

राहुरी शहरातील व्यापारी, व्यावसायिक, शासकीय-निमशासकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्ती, विद्यार्थी असे व्यायामाची आवड असणारे विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन अरुण ताकटे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबची स्थापना केली आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दर रविवारी तालुका तसेच जिल्ह्यातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक पर्यटन व ऐतिहासिक स्थळी सायकलस्वारी केली जाते. युवकांमध्ये पर्यावरण संरक्षण व वैयक्तिक आरोग्याबाबत जाणीव निर्माण होऊन सायकलकडे युवक-युवती आकर्षित व्हावेत, यासाठी क्लबतर्फे विविध सायकल मोहिमांचे आयोजन केले जाते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून तसेच शासनाच्या तंदुरुस्त भारत मोहिमेस प्रतिसाद देण्याच्या हेतूने क्लबच्या वतीने राहुरी ते केवडीया (एकतेचा पुतळा) गुजरात हे 456 कि.मी. हे अंतर सायकलवरुन पार करून एक अनोखा विक्रम केला आहे.

या मोहिमेत अध्यक्ष अरुण ताकटे यांच्यासह गोरक्षनाथ मेहेत्रे, कडूबा इंगळे, लेफ्ट. डॉ. सुनील फुलसावंगे, रवींद्र मोरे, जयंत जाधव, मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब राऊत, नितीन शहाणे, अनिल निकम लेखा, आरिफ इनामदार, सिद्धार्थ लुक्कड या सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे ज्येष्ठ सदस्य हितेशभाई पटेल व जितूभाई पटेल यांचे सहकार्य लाभले.

मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल क्लबचे सदस्य प्रदीप तनपुरे, ज्ञानेश्वर पोपळघट, विलास तरवडे, प्रीतम बोरा, नगरसेवक सोन्याबापू जगधने, शरद बाचकर, रमेश नालकर, सुनील शिंदे, दीपक मेहेत्रे, रवींद्र जाधव, रवींद्र हरिश्चंद्रे, डॉ. अंगराज पवार, निखील भोसले, गिरीश सुराणा, ओंकार दरक, भारत टेमक, बंटी हरिश्चंद्रे, रिंकू अग्रवाल, सतीश डौले, शुभम हिंगे आदींनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या