Tuesday, October 22, 2024
Homeनगरराहुरीच्या देवी भक्तांचा सत्तरमाळ घाटात भीषण अपघात; दाम्पत्य जागीच ठार

राहुरीच्या देवी भक्तांचा सत्तरमाळ घाटात भीषण अपघात; दाम्पत्य जागीच ठार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) येथील भाविक माहूर (Mahur) येथे रेणुकामातेचे दर्शन करून परतत असतांना कार झाडावर आदळून भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातात राहुरी येथील दाम्पत्याचा मृत्यू (Couple Death) झाला तर आठ जण गंभीर जखमी (Injured) झाले आहे. ही घटना आज दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे सहा वाजेदरम्यान पुसद ते वाशिम (Washim) मार्गावरील सत्तरमाळ घाटात घडली आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, राहुरी येथून दहा भाविक तवेरा कारने (MH 16 AJ 6010) ने रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरला गेले होते. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान वाशिममार्गे पुसदकडे (Pusad) येत असतांना सत्तरमाळ घाटात चालकाला डुलकी लागल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सागाच्या झाडावर आदळले. हा अपघात (Accident) एवढा भीषण होता की, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालकासह आठजण गंभीर जखमी (Injured) झाले. या भीषण अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

या अपघातात मनीषा बबन गुलदगड (वय 50), बबन किसन गुलदगड (वय 55, दोघेही रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) हे दाम्पत्य जागीच ठार झाले तर कार चालक मुकुंद दत्तात्रय लांडे (वय 49), मयूर सुरेश रोकोळे (वय 25), सागर शाळाहारी सरोदे (वय 25), किरण भैरव बोरुडे (वय 30), सारिका गोरख सुडके (वय 40), मंदा बाबू गडकळ (वय 50), सार्थक संतोष बोरुडे (वय 13), संतोष लक्ष्मण बोरुडे (वय 40) सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर अशी जखमींची नावे आहेत. अपघात झाल्यानंतर जखमींना मदतीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. याप्रकरणी चालक मुकुंद लांडे (रा. सुडकेमळा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात (Khandala Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व जखमींना वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात (Washim District Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे समजते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या